जमिनीच्या बदल्यात रेल्वेत नोकरी; लालू, राबडी, 2 मुलींसह 16 ठिकाणांवर छापे

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ मे । रेल्वेत नोकरी देण्याच्या बदल्यात आर्थिक लाभ व नावे जमीन हस्तांतरित करण्याच्या आरोपावरून शुक्रवारी माजी रेल्वेमंत्री, राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव, पत्नी राबडी देवी व त्यांच्या कुटुंबीयांसह इतर लोकांशी संबंधित १६ ठिकाणांवर सीबीआयने छापे मारले. ही कारवाई दिल्ली, पाटणा आणि गोपालगंजमध्ये सकाळी ६ वाजता एकाच वेळी केली. पाटण्यात राबडी यांच्या सरकारी निवासावर सुमारे १२ तास पडताळणी करण्यात आली. येथे राबडी आणि मोठा मुलगा तेजप्रताप हजर होते. तेजस्वी यादव पत्नीसमवेत लंडनला गेले आहेत. सीबीआयने लालू, राबडी, त्यांची मोठी मुलगी मीसा आणि दुसरी मुलगी हेमा यांना नव्या प्रकरणात आरोपी केले. लालूंवर रेल्वेच्या ग्रुप डीमध्ये नोकरी देण्याच्या बदल्यात लाभ मिळवल्याचा आरोप आहे. पाटण्यातील लोकांना मुंबई, जबलपूर, कोलकाता, हाजीपूर आणि जयपूर येथे नियुक्त केले. या बदल्यात लाभार्थी व त्यांच्या कुटुंबीयांनी लालूंचे कुटुंबीय व मेसर्स एके इन्फोसिस्टिमला जमीन हस्तांतरित केली.

पाटण्यात १,०५,२९२ चौ. फूट जमीन घेतली

पाटणातील किशुनदेव राय आणि त्यांच्या पत्नीने ६ जानेवारी, २००८ ला ३,३७५ चौरस फूट जमीन राबडींना ३,७५,०० रुपए घेऊन हस्तांतरित केली. या कुटुंबातील ३ सदस्यांना मुंबईत रेल्वेत नियुक्त केले गेले.
पाटण्याचे संजय, धर्मेंद्र राबडींना जमीन विकली. दोघांना नोकरी दिली गेली. किरणदेवीने पाटण्यात ८०,९०५ चौ.फूट जमीन मीसाकडे हस्तांतरित केली. त्यांच्या मुलांना नोकरी मिळाली. आरोप आहे की, लालू कुटुंबीयांनी पाण्यात १,०५,२९२ चौ. फूट जमीन नोकरी दिल्यानंतर मिळवली.
एके इंफोसिस्टमचे अधिकार आणि मालमत्ता राबडी आणि त्यांच्या मुलीला २०१४ मध्ये हस्तांतरित झाल्या. राबडी संचालक बनल्या.
राजकीय बदल बोथट करण्याचा प्रयत्न : राजद
राजद उपाध्यक्ष शिवानंद तिवारींनी म्हटले, छापा बदलत्या राजकीय परिस्थितीला बोथट करण्याचा प्रयत्न आहे. जातीय जनगणनेवर नीतीश-तेजस्वींच्या जवळीकीने भाजप अस्वस्थ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *