पुणे जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यात बियरची विक्रमी विक्री ; 213 कोटींनी महसूलात वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ मे । फेब्रुवारी महिन्यापासून महाराष्ट्रात (Maharashtra) उन्हाचा तडाखा कायम आहे. एप्रिल आणि मे महिन्यात उष्णतेच्या लाटा आल्या होत्या. त्यामुळे अनेकांची पाऊले थंड पेय घेण्याकडे वळत होती. परंतु पुणे जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यात विक्रमी बियरच्या विक्रीची (Beer) नोंद झाली आहे.तब्बल 30 लाख लिटरने बियरच्या विक्रीत वाढ झाली आहे. त्यामुळे 213 कोटींनी महसूलात (Revenue)वाढ झाली आहे. गेल्यावर्षी 1434 कोटी रुपये एवढा महसूल मिळाला होता. यावर्षी त्यामध्ये 1647 कोटी रुपये एवढा महसूल जमा झाला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात तळीरामांनी बियरला चांगलीच पसंती दिल्याची चर्चा आहे.

कोरोना महामारीच्या दुस-या लाटेमध्ये मद्यसेवन करण्याचं प्रमाण अधिक वाढलं होतं. 2021-22 मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या तीन आर्थिक वर्षांमध्ये सर्वाधिक महसूल मिळवला होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार बिअर, देशी दारू आणि वाईनची विक्री गेल्या आर्थिक वर्षात महामारीच्या काळात पहिल्यांदाच वाढली होती. 2021-22 मधील वर्षभरातील भारतीय बनावटीची विदेशी दारू विक्रीने 2019-20 मधील विक्रीला देखील मागे टाकले होते. कोरोना भारतात येण्यापुर्वी तुलनेत गेल्या आर्थिक वर्षात बिअर आणि देशी दारूची विक्री कमी झाली. 2020-21 आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2021-22 मध्ये बिअरच्या विक्रीत अंदाजे 14 टक्के वाढ झाली, परंतु 2019-20 च्या तुलनेत सुमारे 22 टक्के घसरण झाली.

“महाराष्ट्रातील मद्यविक्री 2021-22 मध्ये परत वाढली आहे, विशेष म्हणजे 2020-21 च्या कोरोनाच्या काळात 2020 मध्ये, दारूची दुकाने आणि रेस्टॉरंट काही दिवस बंद राहिले, त्यानंतर मर्यादित वेळेसह पुन्हा उघडल्यानंतर उद्योगाला मोठा फटका बसला होता. अल्कोहोलच्या काही विभागांमध्ये वाढ मंदावली असली तरी,

इतर बाजारपेठांच्या तुलनेत महाराष्ट्रातील व्यवसाय 2021-22 मध्ये अधिक वेगाने परत आल्याचे दिसते.” कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन अल्कोहोलिक बेव्हरेज कंपनीजचे अध्यक्ष दीपक रॉय यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *