आता संयम संपण्याची वेळ आली; राज ठाकरेंसमोर मांडणार बाजू ; वसंत मोरे

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ मे । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज सकाळी 10 वाजता पुण्यात सभा होणार आहे. राज ठाकरे यांच्या सभेपूर्वी पक्षातील अंतर्गत राजकारण पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. नाराज असलेलले पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी राज सभेच्या आदल्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप केले आहे.

“पुण्यातील मनसेचे काही ‘पार्ट टाईम’ नेते वसंत मोरेंनी बांधलेली टीम संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. शहर कार्यालयात बसणारे नेते निराश होऊन काम करत आहेत. मी शहराध्यक्ष असताना कधीही फर्स्टेट झालो नव्हतो. माझ्याविषयी गैरसमज आणि अफवा पसरवणारे हे झारीतील शुक्राचार्य कोण आहेत? महिन्याभरापासून पक्षात हुकूमशाही सूरू असून, आता संयम तुटण्याची वेळ आली” असा सवाल वसंत मोरेंनी विचारला आहे.

दोन दिवसांपूर्वीच पुण्यातील मनसेचे माथाडी कामगार सेनेचे शहराध्यक्ष निलेश माझीरे यांनी पक्षाला रामराम ठोकला. निलेश माझीरे हे मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. मनसेच्या माथाडी कामगार सेनेचे पुणे शहराध्यक्ष यांच्याविषयी पसरवण्यात आलेल्या अफवांमुळे वसंत मोरे चांगलेच संतापले. आम्ही राज ठाकरे यांच्या सभेची तयारी करत असताना कुठूनतरी एक बातमी आली. निलेश माझीरे हे वसंत मोरे यांच्या 20 कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली. ही बातमी कोणी पसरवली माहिती नाही. मात्र, त्यानंतर एका झटक्यात निलेश माझीरे यांच्याकडून माथाडी कामगार सेनेचे अध्यक्षपद काढून घेण्यात आले. त्यांच्याजागी दुसरा पदाधिकारी नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्या. नव्या अध्यक्षाला तातडीने मुंबईला पाठवण्यात आले. निलेश माझीरे यांच्यावर कारवाई करण्याची इतकी घाई कोणाला झाली होती, असा सवाल वसंत मोरे यांनी विचारला. वसंत मोरे यांच्या या आरोपांचा रोख नेमका कोणाच्या दिशेने आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, राज ठाकरे यांच्या सभेवेळी या सगळ्याचा सोक्षमोक्ष लागण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *