औरंगाबाद-पुणे प्रवास होणार आरामदायी; एसटी डेपोला मिळणार २० इलेक्ट्रिक बस

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ मे । औरंगाबाद-पुणे मार्गावर जुलै महिन्यापासून इलेक्ट्रिक बससेवा सुरू करण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने एसटी महामंडळाकडून (Maharashtra State Road Transport Corporation) हालचाली सुरू असून, यासाठी औरंगाबाद एसटी डेपोला (Aurangabad ST Deopt) २० इलेक्ट्रिक बसेस (Electric Bus) मिळणार आहेत. यासाठी महामंडळाकडून चार्जिंग स्टेशन उभारणीला सुरूवात करण्यात येणार आहे. डिझेलची सतत होणारी दरवाढ आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात होणारा खर्च यामुळे एसटी महामंडळाने इलेक्ट्रिक बसेस ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बसेससाठी कंत्राटही देण्यात आले. लवकरच या बसेस महामंडळाच्या मुंबईतील मुख्यालयाकडे येणार आहे. त्यानंतर या बसेसचे वाटप केले जाणार आहे. (Electric Buses In Aurangabad Central Bus Depot)

विभाग नियंत्रक कार्यालयाच्या मागील बाजूस चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. या चार्जिंग स्टेशनमध्ये १५ बसेस चार्जिंग होतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या औरंगाबाद-पुणे मार्गावर १८ शिवशाही बसेस धावत आहे. त्या बसेस बंद करुन प्रवाशांना आरामदायी प्रवासासाठी २० इलेक्ट्रिक बसेस या मार्गावर सुरु करण्यात येणार आहे. पुणे आगाराच्याही किमान २० इलेक्ट्रिक बसेस धावणार असल्याने या मार्गावर फक्त इलेक्ट्रिक बसेसची सेवा असणार आहे. जून अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडयात इलेक्ट्रिक बसेस औरंगाबाद शहरात दाखल होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *