पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त मोरवाडी येथील स्मारकाची स्वच्छता करावी

Spread the love

महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.२४ मे । मोरवाडी  । पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मातेची ३१ मे रोजी जयंती आहे मोरवाडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मातेचे स्मारक आहे गेल्या काही वर्षांपासून महामेट्रोचे काम चालू होते त्यामुळे मेघडंबरीच्या घुमट व पायरीवर सिमेंटबाधकाम करता वेळेस त्यावर सिमेंन्टचे डाग पडलेले आहेत आतिल बाजूस जाळ्या झालेल्या आहेत तसेच मेघडंबरीची रंगरंगोटी करण्यात यावी व पुतळ्याची स्वच्छता करण्यात यावी या संदर्भात कार्यकारी अभियंता (बी.आर.टी.एस ) स्थापत्य व अ क्षेत्रिय अधिकारी यांना मल्हार आर्मी पि.चि.शहर व दर रविवारची साप्ताहिक पुजा तर्फे श्री दिपक भोजने यांनी निवेदन देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *