महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.८ जून । कोरोना पुन्हा आला असून गेल्या काही दिवसातील रुग्णसंख्या चिंता वाढवणारी आहे. राज्यासह देशामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने देशभरातील निर्बंध हटवण्यात आली होती. मात्र कोरोना पुन्हा डोके वर काढू लागल्याने सर्वांनाच धास्ती बसली आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून चार हजारांवर रेंगाळणारा आकडा आता 5 हजारांच्याही वर गेला आहे.
भारत में पिछले 24 घंटों में #COVID19 के 5,233 नए मामले सामने आए हैं, 3,345 लोग डिस्चार्ज हुए और कोरोना से 7 लोगों की मौत हुई है।
कुल मामले: 4,31,90,282
सक्रिय मामले: 28,857
कुल रिकवरी: 4,26,36,710
कुल मौतें: 5,24,715
कुल वैक्सीनेशन: 1,94,43,26,416 pic.twitter.com/oGkOW188cM— ANI_HindiNews (@AHindinews) June 8, 2022
देशात गेल्या 24 तासामध्ये 5 हजार 233 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 345 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 7 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.
सक्रिय रुग्णसंख्येत वाढ
कोरोनाचा आकडा वाढत असल्याने सक्रिय रुग्णांची संख्याही फूगत चालली आहे. 10 हजारांच्याही खाली आलेली रुग्णसंख्या आता 28 हजार 857 वर पोहोचली आहे. आतापर्यंत देशात 5 लाख 24 हजार 715 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक म्हणजे आतापर्यंत कोरोना लसीचे 194 कोटी 43 लाख 26 हजार 416 डोस नागरिकांनी घेतले आहेत. तसेच कोरोना वाढत असल्याने बुस्टर डोस घेण्यासाठीही पुन्हा गर्दी होऊ लागलीय.
महाराष्ट्रात रुग्णसंख्या हजार पार
राज्यात गेल्या चोवीस तासात 1 हजार 881 रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या दोन महिन्यातील ही उच्चांकी रुग्णसंख्या ठरली आहे. राज्यात 878 रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.02 इतका आहे. चांगली बाब म्हणजे राज्यात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.