महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.८ जून । विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची नावे निश्चित केल्यानंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडूनही आपले पत्ते उघड करण्यात आले आहेत. राष्ट्रवादीकडून विधानपरिषद उमेदवारीसाठी एकनाथ खडसे आण रामराजे निंबाळकर यांची नावे जवळपास निश्चित करण्यात आली आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसने पक्षाचे मुंबई शहराध्यक्ष भाई जगताप यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.
राज्यात १० जागांसाठी होत असलेल्या विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतून काँग्रेसच्या वाट्याला दोन जागा आल्या आहेत. एका जागेसाठी काँग्रेसने भाई जगताप यांचं नाव निश्चित केलं असलं तरी दुसरे नाव अद्याप गुलदस्त्यात असून पक्षात याबाबत अजूनही खलबतं सुरू आहेत.