महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई; कोरोना व्हायरसमुळे जगभरात स्थिती गंभीर आहे. संपूर्ण जगच या कोरोना व्हायरसच्या विळख्यात आहे. अमेरिकेसाखा बलाढ्य देशही कोरोनापुढे हतबल झाला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये होणारी वाढ चिंतेचा विषय ठरत आहे. अमेरिकेत कोरोनाने थैमान घातलं आहे. गेल्या 24 तासांत 1509 जणांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 23 हजारवर गेली आहे. अमेरिकेत जगातील सर्वाधिक 5 लाख 81 हजार लोक कोरोनाबाधित आहेत.
न्यूयॉर्कमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 10 हजारवर गेली आहे