बटलरच्या वादळात नेदरलँड उध्वस्त ; वनडेत इंग्लंड संघाचा सर्वाधिक रन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१७ जून । वनडे मध्ये सर्वात मोठा रेकॉर्ड बनला आहे. इंग्लंडने नेदरलँड्सविरुद्ध एकदिवसीय सामन्यात (Eng vs Ned) सर्वोच्च धावसंख्या नोंदवून नवा विश्वविक्रम नोंदवला केला. अॅमस्टेल्विन येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने 50 ओव्हरमध्ये विक्रमी 498 धावा केल्या आणि आपलाच जुना विक्रम मोडलाय. (England score Highest run In ODI)

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम (ODI World Record) इंग्लंडने केलाय. या सामन्यात इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना सुरुवात इतकी चांगली झाली नाही आणि एका रनवर पहिला धक्का बसला. यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. एकूण तीन फलंदाजांनी एकापाठोपाठ एक शतके ठोकली. या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने 50 ओव्हरमध्ये चार गडी गमावून 498 धावा केल्यात.

हा विश्वविक्रम करून इंग्लंडच्या संघाने वनडेतील सर्वात मोठ्या धावसंख्येचा स्वतःचाच विक्रम मोडलाय. याआधी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 481 धावांचा विश्वविक्रमही इंग्लंड संघाच्या नावावर होता.

इंग्लंड संघाकडून फिलीप सॉल्ट याने 93 बॉलमध्ये 122 रन, डेविड मलानने 109 बॉलमध्ये 125 रन तर जोस बटलरने 70 बॉलमध्ये 162 रन ठोकले आहेत.

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम इंग्लंड संघाच्या नावावर होता. 2018 मध्ये नॉटिंगहॅममध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघाने 6 विकेट्सवर 481 धावा केल्या होत्या. आता संघाने नेदरलँड्सविरुद्ध 4 बाद 498 अशी मोठी धावसंख्या उभारून आपलाच जुना विक्रम मोडला आहे. इंग्लंडचा संघही तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2016 मध्ये पाकिस्तानविरुद्ध संघाने 3 विकेट्सवर 444 धावा केल्या होत्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *