प्रकाश आमटेंना रुग्णालयातून डिस्चार्ज ! रक्ताच्या कर्करोगावर महिनाभर पुण्यात उपचार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१८ जून । प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांना रुग्णालयामधून घरी सोडण्यात आलं आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना १३ जून रोजी पुण्यामधील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं. फेसबुकवरुन प्रकाश आमटे यांचे पुत्र अनिकेत आमटे यांनी ही महिती दिली .

१३ जून रोजी डॉ. आमटे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभासाठी आले असता त्यांना ताप आणि खोकला अशी लक्षणे आढळली. त्यानंतर त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. न्यूमोनियावर उपचार सुरु असताना केलेल्या काही चाचण्यांमधून डॉ. आमटे यांना प्राथमिक अवस्थेतील रक्ताचा कर्करोग (ल्यूकेमिया) असल्याचे निष्पन्न झाले. तीन दिवसांच्या उपचारानंतर डॉ. आमटे यांना घरी सोडण्यात आलं असून पुढील उपचार कसे असतील यासंदर्भातील माहिती अनिकेत यांनी डॉ. आमटेंच्या फेसबुक पेजवरुनच दिली आहे.

“बाबांची तब्येत आज बरी आहे. आज सध्या पुरता डिस्चार्ज मिळाला आहे. दोन तीन दिवसांनी तपासणी (चेक अप) होईल. परत रक्ताच्या सर्व टेस्ट करतील आणि ब्लड व्हॅल्यूज ठीक असल्यास लवकरच (आठ ते दहा दिवसांत) केमोथेरपी सुरू करतील. पुढील साधारण महिनाभर ट्रीटमेंट पुण्यातच होणार आहे. बाबांचा आजचा फोटो सोबत जोडला आहे रुमानी सोबतचा. पेशंट कसा असावा याचे आयडीयल उदाहरण आहेत बाबा. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये अतिशय आपुलकीने ट्रीटमेंट करणारे डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, मामा मावश्या सर्वांचे आभार.” असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. आपण सर्वांच्या शुभेच्छा धीर द्यायला सोबत आहेतच, असं म्हणत अनिकेत आमटेंनी सर्व हितचिंतकांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *