महाराष्ट्र २४ – ऑनलाईन -आज दुपारी १२ च्या दरम्यान आलेल्या संख्येनंतर महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची रुग्णसंख्या २ हजाराच्या वर गेली होती. आता काही वेळापूर्वीच हाती आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात ३५२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने ही संख्या आता २३३४ इतकी झाली आहे. महाराष्ट्राच्या काळजीत भर घालणारीच ही बातमी आहे. कारण देशभरात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. करोनामुळे ११ जणांचा मृत्यूही झाला आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्राची चिंता वाढवणारी ही बातमी आहे. कारण महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या ही वाढतेच आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रातला लॉकडाउन हा ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. अशा सगळ्या परिस्थितीत नागरिकांना लॉकडाउनच्या नियमांचं काटेकोर पालन केलं नाही तर हा कालावधी वाढूही शकतो. देशातल्या लॉकडाउनचं काय होणार या प्रश्नाचं उत्तर मंगळावारी मिळू शकतं कारण सकाळी १० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाशी संवाद साधणार आहेत.
महाराष्ट्रात रुग्णसंख्या ही आता २३०० च्या वर गेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर मुंबईत सर्वाधिक रुग्ण आहेत. मुंबईत सर्वतोपरी काळजी घेतली जाते आहे. बाहेर न पडण्याचं आवाहन केलं जातं आहे. आवश्यक असल्यास बाहेर पडलात तर मास्क लावा असंही आवाहन करण्यात आलं आहे. धारावी हा मुंबईतला हॉटस्पॉट आहे. तिथेही प्रादुर्भाव वाढू नये यासाठी काळजी घेतली आहे.