Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधींची आज चौथ्यांदा ईडी चौकशी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२० जून । काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी आज पुन्हा ईडी कार्यालयात नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशीसाठी हजेरी लावणार आहेत. राहुल गांधी यांची ही चौथ्यांदा ईडीकडून चौकशी होणार आहे. मागील आठवड्यात राहुल गांधींची ईडीने सलग तीन दिवस चौकशी केली होती. त्यानंतर आज चौथ्यांदा चौकशी होणार आहे. या दरम्यान आजही काँग्रेसकडून निदर्शने होण्याची शक्यता आहे.

मागील आठवड्यात झालेल्या चौकशीत ईडीने राहुल गांधी यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला होता. राहुल गांधी यांनी पहिल्यांदा 13 जून रोजी ईडी कार्यालयात हजेरी लावली होती. राहुल गांधी यांना पहिल्या दिवशी 50 प्रश्न, दुसऱ्या दिवशी 36 प्रश्न आणि तिसऱ्या दिवशी साधारण 24 प्रश्न विचारल्याची माहिती सूत्रांनी दिली. या दरम्यान राहुल गांधी यांच्या चौकशीचे व्हिडिओ रेकोर्डिंग करण्यात आले. त्याशिवाय, त्यांनी दिलेल्या जबावावर ईडी अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी घेतली असल्याचे म्हटले जात आहे.

तीन दिवसांत 30 तास चौकशी

राहुल गांधी यांची चौकशी केल्यानंतर ईडी आणखी काही बड्या लोकांना चौकशीसाठी समन्स बजावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे यंग इंडियन प्रकरणात ईडीने राहुल गांधी यांची तीन दिवस 30 तासांपेक्षा अधिक वेळ चौकशी केली. या चौकशीदरम्यान राहुल गांधी यांची बँक खाती, परदेशी मालमत्ता आणि यंग इंडियन आणि असोसिएट जर्नल लिमिटेडला दिलेल्या कर्जाबाबत चौकशी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *