MLC Election : प्रकृती नाजूक असतानाही भाजप आमदार मुंबईला रवाना

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२० जून । विधान परिषद निवडणुकीसाठी (MLC Election) एक एक आमदाराच्या (mla) मताला मोठी किंमत आहे. त्यामुळे सर्वच पक्ष आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवले आहे. पण, पुण्याच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक (bjp mla mukta tilka) या सर्व आमदारांसाठी आदर्श ठरल्या आहे. प्रकृती अत्यंत नाजूक असतानाही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पुण्याहून मुंबईकडे रवाना झाल्या आहेत.भाजपच्या कसबा विधानसभेच्या आमदार मुक्ता टिळक या विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदानासाठी पुण्याहून रवाना झाल्या आहेत. मुक्ता टिळक यांची प्रकृती दुर्धर आजाराने अत्यंत नाजूक आहे. पण, पक्षाचा आदेश हा रक्तात भिनलेला असं सांगत मुक्ता टिळक यांनी मतदानाचा हक्क बजावणारच असं ठामपणे सांगितलं आहे.

‘आज मतदान आहे, सर्वपक्षांनी आपली प्रतिष्ठापणाला लावली आहे. भारतीय जनता पार्टी मागे कशी राहिली. पक्षाने आदेश दिले असून पहिल्यापासून पक्षाचा आदेश पाळणे हे आमच्या रक्तात भिणलेलं आहे. त्यामुळे पक्षासाठी मतदान करण्यासाठी निघाले आहे, असं टिळक यांनी ठामपणे सांगितलं.’देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं झालं आहे. त्यांनी माझे आभार मानले आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूमध्ये आले होते, त्यावेळी त्यांनी फोन करून विचारपूस केली होती. पक्षातील सर्व लोक काळजी घेत आहे, त्यामुळे विशेष ममत्व आहे’ असंही टिळक म्हणाल्या.

विशेष म्हणजे, मुक्ता टिळक यांनी राज्यसभा निवडणुकीच्या वेळीही प्रकृती अत्यंत नाजूक असतानाही मुंबईत येऊन मतदान केलं होतं. त्यानंतर विजयी उमेदवारांनी मुक्ता टिळक यांच्या घरी जाऊन आभार मानले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *