महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२२ जून । महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर वृत्तीमुळे राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण झाले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) हे आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देऊ शकतात. याआधी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे ट्विटही समोर आले होते, त्यानंतर उद्धव ठाकरे हे पदाचा राजीनामा देतील, अशी शक्यता वर्तवली जात होती.
त्याआधी महाराष्ट्र विधानसभा बरखास्त होण्याची शक्यता वर्तवली जात असून शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी याबाबत ट्विट करून संकेत दिले आहेत. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी विधानसभा बरखास्त करण्याचे संकेत दिले आहेत. ‘महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने’ असे त्यांनी ट्विट केले आहे.