महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२२ जून । राज्यात राजकीय घडामोडी घडत असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना कोरोनाची (Corona Virus) लागण झाल्याची माहिती मिळत आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथन यांनी याबाबतची माहिती दिली आहे. कमलनाथ हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार होते. मात्र त्याआधी त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती कमलनाथ यांनी पत्रकारांना दिली आहे. (CM Uddhav Thackeray Corona Positive Marathi News)
एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या बंडाने शिवसेनेसाठी संघर्षाचा काळ सुरु असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोरचं संकट काही केल्या संपत नाहीये. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज सकाळी कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. असं असतानाच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे .
काँग्रेस नेते कमलनाथ यांच्याबरोबरच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. उद्धव ठाकरे यांना जरी कोरोनाची लागण झाली असली तरी त्यांची प्रकृती ठीक आहे. काँग्रेस नेते कमलनाथ यांच्याशी त्यांचं बोलणं झालं आहे, अशी माहितीही नाना पटोले यांनी दिली.