महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२२ जून । राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना, भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ‘संजय राऊत खुश ! कारण त्याला शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याचा व शिवसेनेला संपवल्याचा आनंद झाला असेल. कपटी, कारस्थानी व दुष्ट बुद्धीच्या माणसाची ही कटकारस्थाने.’ असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.
राज्यातील सत्ता संघर्षाच्या खेळात आता मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राणेंच्या टीकेला आता राऊत काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं आहे.