महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२२ जून । अडीच वर्ष सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारवर अस्थिरतेचे ढग जमा झाले आहे. शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (shivsena leader eknath shinde) यांनी आमदारांना घेऊन बंड पुकारले आहे. शिंदेंचा गट हा भाजपला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याची चर्च रंगली आहे. तर आता राष्ट्रवादीच्या आमदारांनी आपणच भाजपला पाठिंबा द्यावा, अशी मागणीची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांकडे केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी 33 आमदार आणि अपक्षांना घेऊन सुरत व्हाया गुवाहाटीमध्ये तळ ठोकला आहे. एकनाथ शिंदे यांनी अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केली नसली तर भाजपने नेते शिंदेंच्या मदतीला धावून आले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे शिवसेनेला घेऊन भाजपमध्ये सामील होतील, अशी चर्चा रंगली आहे. शिवसेनेच्या आमदारांच्या या नाट्यामुळे राष्ट्रवादी हैराण झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांनी 2014 चा प्रस्ताव पुढे काढला आहे.
राष्ट्रवादीच्या ४ आमदारांनी भाजपसोबत सत्त स्थापन करण्यासाठी निर्णय घ्या, अशी मागणीच बैठकीमध्ये केली आहे. आमदारांच्या या मागणीमुळे बैठकीत एकच खळबळ उडाली. पण, शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्यास नकार दिला आहे.
भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यापेक्षा विरोधी पक्षात राहू, विरोधी बाकावर आपण बसू,असं म्हणत शरद पवर यांनी २०२४ च्या निवडणुकीच्या कामाला लागा असा सल्ला दिला आहे. शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्यासाठी स्पष्ट नकार दिला आहे. जर राष्ट्रवादीने जर अशी कोणतीही खेळी खेळली तर एकनाथ शिंदेंच्या मेहनतीवर पाणी फेरले जाण्याची दाट शक्यता आहे. मात्र, भाजप राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन करेल का हा ही मोठा प्रश्न आहे. तुर्तास पवारांनी विषयाला नकार दिला आहे.