109 total views
हाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२३ जून । शिवसेना नेत्यांच्या बंडानंतर आता शिवसेनेसोबत अवघे १३ आमदार उरले आहेत. त्या १३ आमदारांची वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे फक्त १३ आमदार उपस्थित होते. शिवसेनेकडे १४ आमदार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, बैठकीला फक्त १३ आमदार पोहोचले. त्यामुळे आणखी एक आमदार शिंदे गटात गेल्याची चर्चा आहे. आजच्या बैठकीत आमदारांची भूमिका काय आहे हे जाणून घेतली गेली. तसेच, पुढची रणनीतीही ठरवली जाणार असल्याची माहिती आहे.
शिवसेनेचे ते १३ आमदार कोण?
संतोष बांगर
उदय राजपूत
वैभव नाईक
दिलीप लांडे
कैलास पाटील
नितीन देशमुख
सुनिल प्रभू
रवींद्र वायकर
अजय चौधरी
आदित्य ठाकरे
सुनील राऊत
उदय सामंत
राजन साळवी
एकनाथ शिंदेंसोबत ४२ आमदार
तर शिवेसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदेंसोबत ४२ आमदार असल्याचा दावा आहे. पण, त्यातील ७ आमदार अपक्ष आहेत. म्हणजेच शिंदे गटात सध्यातरी शिवसेनेचे ३५ आमदार आहेत.