राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी संघर्षाची तयारी ठेवावी ; शरद पवार यांनी दिले भविष्यातील राजकारणाचे संकेत

 145 total views

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२३ जून । महाविकास आघाडी सरकार शेवटची घटका मोजत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना आणि नेत्यांना आज बैठकीत महत्वपूर्ण विधान करत पुढील काळात संघर्षाची तयारी ठेवा. असा आदेश दिला आहे. शरद पवार यांच्या ‘या’ सूचक विधानामुळे राज्याचं राजकारण पुढे काय वळण घेणार याचा अंदाज लावता येईल.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल रात्री वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते.

आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जयंत पाटील, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड या प्रमुख नेत्यांना बोलवले होते. या मीटिंग दरम्यान शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. महाविकासआघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्याशी पाठीशी आहे. पण तुम्ही आता कणखर भूमिका घ्यावी आणि पुढील काळात निर्णय घ्यावेत. असे पवार यांनी मुख्यमंत्र्यांना म्हटले आहे.

दरम्यान, ‘महाविकास आघाडी सरकारच्या बाबतीत काय होईल ते होईल. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी संघर्षाची तयारी करा’. असे म्हणत पवार यांनी भविष्यातील राजकारणाचे संकेत दिले आहेत. आज शरद पवार संध्याकाळी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पाच वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार खासदार तसेच इतर महत्त्वाचे पदाधिकारी यांच्याशी थेट संवाद साधणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *