महाविकास आघाडीचं सरकार अजूनही मजबूत ; पण सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न करावेत – प्रकाश आंबेडकर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२३ जून । सध्या महाविकास आघाडी सरकारच्या भविष्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. “आम्ही मविआतून बाहेर पडायला तयार, तुम्ही मुंबईत या”, असं आवाहन संजय राऊतांचं (Sanjay Raut) एकनाथ शिंदेंना केलं. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी भाष्य केलंय. महाविकास आघाडी पडेल असं वाटत नाही, सरकार अजूनही मजबूत आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलंय. महाविकास आघाडी पडेल असं वाटत नाही, सरकार अजूनही मजबूत आहे, असा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलाय.

शिवसेनेचे आमदार आसाममध्ये नेवून ठेवलं आहे. तिथं सध्या पूर परिस्थिती आहे. आसाममध्ये काँग्रेस विरोधी पक्षात आहे. तिथल्या स्थानिकांना घेऊन काँग्रेसने शिवसेना आमदार थांबलेत त्या हॉटेलमध्ये घेऊन जावं आणि मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारावा की, बाहेरच्या लोकांना तुम्ही थांबू देता मग या सामान्य लोकांनाही इथे राहू द्या,तिथल्या सरकारला अडचणीत आणा. सहज शिवसेना आमदार मुंबईत येतील, असं प्रकाश आंबेडवर म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *