महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी – सलमान मुल्ला। दि.२५ जून । उस्मानाबाद:-घरातून कोणासही न सांगता निघून परंडा परिसरात आलेल्या पंढरपुर तालूक्यातील खरातवाडी येथिल १३ वर्षीय भोळसर मुलगी सानिका दामोधर जाधव या मुलीच्या कुटूंबाचा परंडा पोलिसांनी दि. २२ रोजी रात्री मिशन मुस्कान अंर्तगत अर्धा तासात शोध घेऊन मुलीस वडीलाकडे सुपूर्त केले आहे.
पोलिसा कडून मिळालेल्या माहिती नुसार दि २२ जुन रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास परंडा कुर्डुवाडी रोडवरील जगताप ढाबा येथे अल्पवयीन अनोळखी मुलगी एकटीच असल्याची माहिती परंडा पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक सुनिल गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक कवीता मुसळे व पोलिस पथक तात्काळ जगताप ढाबा येथे पोचुन मुलीला ताब्यात घेतले.
मुलीला पोलीस ठान्यात आणून नाव व गावची चौकशी केली असता खरातवाडी ता. पंढरपुर येथिल असल्याचे तीने सांगीतल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक कवीता मुसळे यांनी करकंब पोलिस ठाण्याला संपर्क साधून माहिती दिली.
व खरातवाडी येथील पोलीस पाटील यांच्या मार्फत सारिकाचे वडील दामोदर जाधव यांच्याशी संपर्क साधून मुलीची माहिती देऊन खात्री केली..
खात्री पटल्यानंतर मुलीचे वडील दामोदर जाधव यांना परंडा पोलीस स्टेशन येथे बोलावून घेतले त्याचे वडील व इतर नातेवाईक रात्री बारा वाजता पोलीस स्टेशनला हजर झाले त्यानंतर सर्व खात्री करून मुलीला त्यांच्या ताब्यात देण्यात आले..
यावेळी माहिला पोकॉ चव्हाण, पोकों वडदरे, पोकों कोळेकर, पोना भांगे यांची उपस्थिती होती.