![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२६ जून । सुदीपकुमार देवकर । कळंब । पवनराजे फाउंडेशन द्वारे ,इटकुर,येथे रेशन कार्ड संदर्भातील समस्यांचे निवारण तसेच ई-श्रम कार्ड नोंदणी करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यात सर्व गावतील नागरिकांनी उत्साही सहभाग घेतला. नागरिकांच्या समस्या घर बसल्या सोडविल्या जात असल्याबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
याप्रसंगी उदयप्रकाश माकोडे, लक्ष्मण अडसूळ,गंभीरे गुंडेराव, विलास गाडे,हनुमंत कसपटे, बाळासाहेब गंभीरे,विजय माने, अनिल गिरे, श्रीमंत अडसूळ, सचिन गव्हारे, आबासाहेब अडसूळ,रोहित गुरसाळे, अविनाश कराड,मनोज पवार व गावातील नागरिक तसेच पवनराजे फाउंडेशन टीमचे सर्व सदस्य उपस्थित होते.
