राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आता छगन भुजबळयांना यांना कोरोना

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२७ जून । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राला राजकीय ग्रहण लागल्याचं चित्र दिसून येतंय. नगविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल नऊ मंत्री हे गुवाहाटीला जाऊन बसले आहेत. त्यामुळे राज्यात सत्तासंघर्ष पाहायला मिळतो आहे. त्यात दुष्काळात तेरावा म्हणून कोरोनाही एका एकाचा समाचार घ्यायला विसरत नाहीये. आधी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि आज उपमुख्यमंत्री यांना कोरोनची लागण झाल्याची माहिती समोर येते आहे. त्यात आता मंत्री छगन भुजबळ यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

मंत्री छगन भुजबळ यांनी स्वतः ट्विट करत यासंबंधीची माहिती दिली आहे. “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे.डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू असून आपणा सर्वांच्या आशिर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी बरा होईल. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ टेस्ट करून घ्यावी” असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होतीा. कोरोनातून बरं होऊन राज्यपाल नुकतेच परतले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. एकनाथ शिंदे गटातील मंत्री सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या खात्याची फेररचना केली आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना अतिरिक्त कार्यभार दिला आहे. या सर्व घडामोडीमध्ये अजित पवार कोरोनामुळे क्वारंटाईन झाल्यानं त्याचा परिणाम राज्य सरकारच्या कामगिरीवर होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *