अमेरिकेत कोरोनाचं तांडव सुरुच, २४ तासात आतापर्यंतचे सर्वात जास्त मृत्यू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन : वॉशिंग्टन : अमेरिकेत गेल्या 24 तासात 2,600 लोकांना मृत्यू झालेला आहे. कोणत्याही देशात एकाच दिवसात मृत्यू होण्याची ही सर्वाधिक संख्या आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेत मृतांचा आकडा 25000 च्या वर गेला आहे. इतर देशातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंपेक्षा ही संख्या जास्त आहे. एक दिवसात याआधी अमेरिकेत 2,569 लोकांना मृत्यू झाला होता.

अमेरिकेतील कोरोनामध्ये वाढत्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सामाजिक अंतर राखण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची नितांत आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेत आतापर्यंत 6 लाखाहून अधिक कोरोना बाधित लोक आहेत तर मृतांचा आकडा 25 हजारांच्या पुढे गेला आहे.

जगात कोरोनामुळे अमेरिकेत सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. दररोज येथे मोठ्या संख्येने नवीन रुग्ण आढळत आहेत. न्यूयॉर्कमध्ये कोरोनाचा सर्वाधिक परिणाम झाला असून मृतांची संख्याही सर्वाधिक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *