मुख्यमंत्री होणार हे तुम्हाला कधी समजलं? एकनाथ शिंदेंचं दिले हे उत्तर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२ जुलै । गेल्या 8 ते 10 दिवसात राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर अनेक शिवसेना आणि अपक्ष आमदार त्यांच्यासोबत गेले. यामुळे महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात आलं आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर भाजपने एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. भाजप मुख्यमंत्रीपदासाठी हे सर्व करत आहे आणि देवेद्र फडणवीसच (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होतील, असा अंदाज जवळपास सगळे लावत होते. मात्र ऐनवेळी फडणवीसांनी एकनाथ शिंदेंच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

आता समोर आलेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, फक्त सामान्य जनतेलाच नाही तर स्वतः एकनाथ शिंदे यांनाही आपण मुख्यमंत्री होणार असल्याची कल्पना नव्हती. एका मुलाखतीमध्ये बोलताना एकनाथ शिंदे यांनी याबाबत खुलासा केला आहे. तुम्ही मुख्यमंत्री होणार आहात, हे तुम्हाला कधी समजलं? असा प्रश्न शिंदे यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की ‘मला हे सगळं अनपेक्षित होतं. मात्र लोकांमध्ये असा समज होता की भाजप स्वतःला मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून फोडाफोडीचं राजकारण करत आहे. हा आरोप त्यांनी खोटा ठरवला. भाजपकडे संख्याबळ जास्त असतानाही त्यांनी माझ्यासारख्या सामान्या कार्यकर्त्यावर विश्वास दाखवला’, असंही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *