महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ जुलै । शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात भाजपाने मुख्यमंत्रीपदाची माळ घातल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही असं म्हटलं. त्यानंतर काही तासांमध्येच एकनाथ शिंदेंची पक्षामधून हकालपट्टी करण्यात आली. पक्षविरोधी कारवायांमुळे हकालपट्टी करत असल्याचं या पत्रात म्हटलंय. असं असतानाच एकनाथ शिंदेंनी हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही या उद्धव ठाकरेंच्या टीकेवरुन प्रश्न विचारला असताना सध्या थेट प्रतिक्रिया दिली नसली तर या प्रश्नाला मोजक्या शब्दांमध्ये उत्तर दिलंय.
शिंदे काय म्हणाले?
मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या वृत्तवाहिनीला मुलाखत देताना एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंनी केलेल्या या टीकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. इंडिया टुडेच्या मुलाखतीमध्ये, हा मुख्यमंत्री शिवसेनेचा नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत, असा संदर्भ देत शिंदेंची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न मुलाखतकाराने केला. त्यावर शिंदेंनी, “मी याबद्दल काही बोलू इच्छित नाही, योग्य वेळी नक्की बोलेन,” असं सांगत यावर थेट भाष्य करणं टाळलं.