साहेबांनी विजयासह केला टीम इंडियाचा करेक्ट कार्यक्रम

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ जुलै । ऐतिहासिक विजय मिळवण्याची संधी असलेला सामना कसा गमवायचा याचे उत्तम उदाहरण म्हणजे भारतीय क्रिकेट संघाने खेळलेला इंग्लंडविरुद्धचा पाचवा कसोटी सामना होय. पाचवी कसोटी ड्रॉ करून किंवा त्याच विजय मिळून इंग्लंडच्या भूमीत १५ वर्षानंतर कसोटी मालिका जिंकण्याची संधी होती. इतक नाही तर ५ सामन्यांची मालिका प्रथमच जिंकण्याची संधी होती. मात्र जो रूट आणि जॉनी बेयरस्टो यांच्या शतकी खेळीने भारताचा ७ विकेटनी पराभव झाला आणि मालिका देखील २-२ अशी बरोबरीत सुटली.

भारतीय संघासाठी ही मालिका फक्त इंग्लंड भूमीवरील विजयासाठी नाही तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप(icc world test championship)च्या दृष्टीने महत्त्वाची होती. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या सत्रात भारताने फायनलमध्ये प्रवेश केला होता. तेव्हा अंतिम सामन्यात भारताचा न्यूझीलंडने पराभव केला होता. या वेळी WTCच्या दुसऱ्या सत्रात न्यूझीलंड फायनलमध्ये पोहोचण्याच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. इंग्लंडकडे देखील कोणतीही संधी नाही.

WTC गुणतक्त्यात भारत तिसऱ्या स्थानावर आहे. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताला पहिल्या दोनमध्ये रहावे लागले. गेल्या वेळी भारताने ७० टक्केपेक्षा अधिक गुण मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला होता. तेव्हा फायनलमध्ये पोहोचलेल्या दोन्ही संघाकडे ७० टक्के पेक्षा अधिक गुण होते.

WTCच्या दुसऱ्या सत्रात भारताच्या अजून ६ कसोटी सामने शिल्लक आहेत. इंग्लंडविरुद्धच्या कसोटीनंतर भारताला घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ तर बांगलादेशविरुद्ध त्याच्या घरच्या मैदानावर २ कसोटी सामने खेळायचे आहेत. WTCच्या दुसऱ्या सत्रात भारताला फायनलमध्ये पोहोचायचे असेल तर पुढील ६ पैकी ६ सामने जिंकावेच लागतील. भारताने ६ पैकी ५ किंवा कमी सामने जिंकले तरी भारत टॉप-२ मध्ये स्थान मिळवू शकते. पण तेव्हा त्यांना दुसऱ्या संघांच्या निकालावर अवलंबून रहावे लागले.

इंग्लंड स्वत: WTC फानयलमध्ये पोहोचू शकत नाही. पण त्यांनी पाचव्या कसोटीत भारताचा पराभव करून टीम इंडियाला चांगलेच अडचणीत आमले आहे. आता पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये उपविजेते ठरलेल्या भारताला पुढील प्रत्येक कसोटी सामना जिंकावा लागले. तसेच झाले नाही तर गेल्या वेळी अंतिम फेरी खेळलेले दोन्ही संघ यावेळी विजेतेपदाच्या शर्यतीत दिसणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *