महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ जुलै । राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत शिवसेनेने एनडीएच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. याबाबत अधिकृत घोषणा शिवसेना पक्षप्रमूख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत केली आहे. ठाकरे म्हणाले, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील असो की, प्रणव मुखर्जी यांना शिवसेनेने समर्थन दिले आहे. पक्षाच्या पलिकडे जाऊन काम करण्याची शिवसेना प्रमूखांची भूमिका मी पार पाडत आहे. पक्षापेक्षा देशहित महत्वाचे आहे असे मी मानतो, त्यामुळेच द्रौपदी मुर्मू यांना आमचा पाठिंबा आहे.
ठाकरे म्हणाले, काही बातम्या फार विचित्र पद्धतीने आल्या आणि जनतेसमोर गेल्या. काल खासदारांच्या बैठकीत माझ्यावर काहीही दबाव आला नाही. राष्ट्रपती पदासाठी मुर्मू यांना पाठिंबा देण्यावरून दबाव खासदारांचा दबाव नव्हता. हा निर्णय आम्ही देशहितासाठी घेतला. शिवसेनेची नेहमीच देशहिताची भूमिका राहीली आहे. आदीवासी समाजातील काही प्रमुख व्यक्ती माझ्याकडे आल्या आणि त्यांनी आदिवासींना प्रतिनिधीत्व मिळत आहे, त्यामुळे आपण मुर्मू पाठिंबा द्यावा. आदिवासी केवळ आदिवासी नाहीत ते देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान होऊ शकतात अशी त्यांची भुमिका आग्रह झाला, त्या सर्वांचा मान मी ठेवत पाठिंबा दिला आहे. यामागे राजकारण सुरु आहे. माझ्यावर दबाव होता असे म्हटले गेले तर ते चूकीचे आहे.