महाराष्ट्रात ५५२ नवे करोनाग्रस्त; तर ५०७ रुग्ण बरे झाले, एकूण रुग्णसंख्या ४२०० वर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन । पुणे । विशेष प्रतिनिधी ! राज्यात आज करोनाबाधित ५५२ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ४२०० झाली आहे. १४२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ५०७ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ३४७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७२ हजार ०२३ नमुन्यांपैकी ६७ हजार ६७३ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत. तर ४२०० जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८७ हजार २५४ नागरिक होम क्वारंटाइनमध्ये असून ६,७४३ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *