व्होडाफोन-आयडियाने लॉकाडाऊनच्या काळात ग्राहकांसाठी दिलेली डबल डेटा सर्व्हिस केली बंद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन ।मुंबई । विशेष प्रतिनिधी ! टेलिकॉम कंपनी व्होडाफोन-आयडियाने लॉकाडाऊनच्या काळात त्यांच्या ग्राहकांसाठी दिलेली डबल डेटा सर्व्हिस बंद केली आहे. यामुळे कंपनीच्या ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. देशातील आठ सर्कलमधील डबल डेटा ऑफरचे प्लॅन बंद केले आहेत. कंपनीने गेल्याच महिन्यात 249, 399 आणि 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये डबल डेटाची ऑफर दिली होती. यानुसार दीड जीबी डेटा मिळत होता त्याऐवजी तीन जीबी डेटा ग्राहकांना दिला होता.

रिपोर्टनुसार व्होडाफोन-आयडियानं आंध्रप्रदेश, बिहार, गुजरात, केरळ, महाराष्ट्र आणि गोवा, नॉर्थ इस्ट, पंजाब, उत्तर प्रदेशात त्यांच्या डबल डेटाची ऑफर बंद केली आहे. यामुळे 249 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणारा तीन जीबी डेटा आणि दररोज दीड जीबी मिळणार आहे. यूजर्सना या प्लॅनमध्ये इतर सुविधा पहिल्याप्रमाणेच मिळतील. यात अनलिमिटेड कॉलिंग, 100 एसएमएस आणि व्होडाफोन प्ले, झी 5 अँप चा समावेश आहे. या पॅकची वैधता 28 दिवसांसाठी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *