महाराष्ट्र २४- ऑनलाईन ।मुंबई । विशेष प्रतिनिधी ! जगभरात कोरोनाचा कहर सुरु आहे. जगात कोरोनामुळे आतपर्यंत 1 लाख 65 हजारहून अधिकांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 24 लाख 6 हजार 800वर पोहचली आहे.
@भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा 17 हजार 265पर्यंत पोहचला आहे. तर आतापर्यंत 2547 कोरोनातून बरे झाले आहेत. भारतात 543 लोकांना कोरोनामुळे
आपला जीव गमवावा लागला आहे.
@ गेल्या 24 तासांत भारतात 1553 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 36 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात पहिल्यांदाच एका दिवसांत
कोरोनाग्रस्तांचा आकडा दीड हजारांवर गेला आहे.
@ गेल्या 24 तासांत 316 लोक बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचाही हा आतापर्यंतचा एका दिवसांतील सर्वात मोठा आकडा आहे.
@ महाराष्ट्रात 24 तासांत करोनाचे 552 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 12 जणांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आतापर्यंत 3651 कोरोनाबाधित
असून 211 जणांचा मृत्यू झाला आहे.