महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ जुलै । उपराष्ट्रपदाच्या निवडणुकीत युपीएकडून मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना युपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा देणार असल्याची घोषणा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
विरोधी पक्षांच्या बैठकीत 17 पक्ष होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे. या बैठकीत मार्गारेट अल्वा यांच्या उमेदवारीवर सर्व पक्षांचे एकमत झाले आहे. त्या अनुभवी नेत्या आहेत. आम्ही सर्व त्यांच्या पाठिशी आहोत, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
युपीएकडून उपराष्ट्रपतीपदासाठी मार्गारेट अल्वा यांची नावाची घोषणा करण्यात आल्यानंतर शिवसेना अल्वा यांना पाठिंबा देणार असल्याचे शिवसेनेकडून जाहीर करण्यात आले आहे.