इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याची निवृत्तीची घोषणा, उद्या अखेरची मॅच खेळणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ जुलै । Ben Stokes announces retirement, Breaking : इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याची निवृत्तीची घोषणा, उद्या अखेरची मॅच खेळणार इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेत सर्वांना धक्का दिला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उद्या होणाऱ्या वन डे सामन्यात तो शेवटचे राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. ३१ वर्षीय स्टोक्सने १०४ वन डे सामन्यांत प्रतिनिधित्व केले असून २०१९च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये त्याने प्लेअर ऑफ दी मॅचचा पुरस्कार पटकावला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या वर्ल्ड कप फायनल लढतीत स्टोक्सने नाबाद ८४ धावांची अविस्मरणीय खेळी केली होती. २०११मध्ये त्याने आयर्लंडविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्याच्या नावावर तीन शतकांसह २९१९ धावा व ७४ विकेटे्स आहेत.

त्याच्या नेृत्वाखाली त्याने मागील वर्षी पाकिस्तानविरुद्धची वन डे मालिका ३-० अशी जिंकली होती. बेन स्टोक्सने सोशल मीडियावरून निवृत्तीची घोषणा केली,”मंगळवारी डरहॅम येथे मी इंग्लंडसाठी अखेरचा वन डे सामना खेळणार आहे. वन डे क्रिकेटमधून मी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेणे माझ्यासाठी अत्यंत आव्हानात्मक होते. इंग्लंड संघातील प्रत्येक खेळाडूसोबत खेळतानाचा मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला आहे. आमचा प्रवास अविश्वसनीय होता.”

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *