देशात ४ दिवस काम अन् ३ दिवस सुट्टी कधीपासून लागू होणार? केंद्र सरकारनं संसदेत दिलं उत्तर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ जुलै । नवीन लेबर कोड १ जुलैपासून लागू होणार होता. मात्र काही राज्य सरकारांमुळे लेबर कोड लागू होऊ शकला नाही. सरकारनं चार नव्या बदलांसाठी लेबर कोड आणला आहे. नवा लेबर कोड लागू झाल्यानंतर साप्ताहिक सुट्ट्यांपासून इन हँड सॅलरीपर्यंत अनेक गोष्टी बदलतील. ४ दिवस काम आणि ३ दिवस सुट्टी याची प्रतीक्षा देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांना आहे. त्या पार्श्वभूमीवर कामगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी संसदेत आज महत्त्वाची दिली.

नवीन लेबर कोड लागू करण्यासाठी कोणतीही डेडलाईन निश्चित करण्यात आली नसल्याचं तेली यांनी लोकसभेत लिखित उत्तराच्या स्वरुपात सांगितलं. बहुतांश राज्यांनी चार लेबर कोडच्या नियमांचा मसुदा केंद्राला पाठवला आहे. १ जुलैपासून लेबर कोड लागू होईल अशा शक्यता वर्तवल्या जात होत्या. मात्र काही राज्यांकडून मसुदा येणं बाकी आहे, अशी माहिती तेली यांनी दिली.

इंडस्ट्रीयल रिलेशन्स कोडबद्दल २५ राज्यांनी मसुदा सादर केला आहे. तर ऑक्युपेशनल सेफ्टी कोडसंदर्भात २४ राज्यांकडून मसुदा सादर करण्यात आला आहे. सगळ्या राज्यांमध्ये एकाचवेळी कोड लागू करण्याचा सरकारचा मानस आहे. कामगार मंत्रालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबरपासून नवीन वेज कोड लागू केला जाऊ शकतो. मात्र सरकारनं अद्याप तरी याबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही.

नवीन वेज कोड लागू झाल्यावर बेसिक सॅलरीमध्ये बदल होईल. टेक होम म्हणजेच इन हँड सॅलरी कमी होईल. सरकारनं पे रोलसंदर्भात नवे नियम तयार केले आहेत. नव्या वेज कोडच्या अंतर्गत कोणत्याही कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी त्याच्या एकूण सॅलरीच्या ५० टक्के किंवा त्यापेक्षी अधिक असायला हवी. बेसिक सॅलरी वाढल्यानं पीएफ खात्यात अधिक रक्कम जमा होईल. त्याचा फायदा निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना होईल.

नव्या वेज कोडनुसार, कर्मचाऱ्यांना आठवड्यातून चार दिवस काम आणि तीन दिवस सुट्ट्यांचा पर्याय मिळेल. आठवड्यातून तीन दिवस सुट्टी घेण्याचा पर्याय निवडणाऱ्यांना उरलेले ४ दिवस दररोज १२ तास काम करावं लागेल. याचा अर्थ कर्मचाऱ्यांना आठवड्याला कोणत्याही परिस्थितीत ४८ तास काम करावं लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *