या आठवड्यामध्ये ‘या’ जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; पाहा हवामान विभागाचा अंदाज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ जुलै । सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे वातावरणातील बदलांचा आरोग्यावर, शेतीवर परिणाम होत आहे. येत्या पाच दिवसांमध्येही विदर्भ, कोकण येथे मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचे अनुमान हवामान विभागाने वर्तवण्यात आले आहे. यासोबतच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथेही बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. राज्यात सरासरीच्या ४७ टक्के अतिरिक्त पाऊस नोंदवला गेला आहे. राज्यातील चारही हवामान विभागांमध्ये अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस मराठवाड्यात पडला असून जुलैमधील पावसाने विदर्भामध्येही सरासरीहून अतिरिक्त पाऊस नोंदवला गेला आहे.

इथे अतिरिक्त पर्यन्यमान

-मध्य भारतामध्ये सर्वाधिक पाऊस

-गोवा, महाराष्ट्रात अतिरिक्त तर गुजरात, दादरा-नगर हवेली येथे तीव्र अतिरिक्त पाऊस

-१८ जुलै रोजी राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये तीव्र अतिरिक्त पाऊस, १७ जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त पाऊस

-मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आत्तापर्यंतच्या सरासरीच्या तुलनेत अतिरिक्त पाऊस

-नांदेडमध्ये १५२ टक्के अतिरिक्त पाऊस, राज्यात सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस

-लातूरमध्ये १०१ टक्के तर नाशिकमध्ये ११४ टक्के अतिरिक्त पाऊस

-विदर्भात वर्धा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर येथे तीव्र अतिरिक्त पाऊस

-मध्य महाराष्ट्रात नाशिक, पुणे येथे तीव्र अतिरिक्त पाऊस

-कोकणात पालघर येथे तीव्र अतिरिक्त पाऊस

-मुंबई शहर सरासरीच्या श्रेणीमध्ये, सरासरीहून ९ टक्के अधिक पाऊस तर रत्नागिरीही सरासरीच्या श्रेणीमध्ये असून सरासरीहून १४ टक्के अधिक पाऊस

इथे मात्र तूट

-सांगली जिल्ह्यात पावसाची ३१ टक्के तूट

-मराठवाड्यात एकूण पाऊस सरासरीच्या ८२ टक्के

-विदर्भात एकूण पाऊस सरासरीच्या ५७ टक्के

-विदर्भात या आठवड्यामध्ये पावसाचा जोर कायम, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *