Maharashtra: राज्यात अतिवृष्टीचा कहर, 108 जणांचा बळी, विदर्भात पूरस्थिती कायम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० जुलै । गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीचा कहर (Heavy rainfall in Maharashtra) अजूनही कायम आहे. धक्कादायक बाब म्हणजे आतापर्यंत झालेल्या मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे 108 जणांचा बळी गेला आहे, तर कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेले आहे. कोकणातील परिस्थिती यंदा नियंत्रित असून विदर्भात मात्र पूरस्थिती कायम आहे. पुरामुळे राज्यात 28 जिल्हे आणि 289 गावे प्रभावित झाली असून 83 तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात आली आहेत. आतापर्यंत 12 हजार २३3 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. आत्तापर्यंत अतिवृष्टीमुळे 189 प्राणी दगावले आहेत. पावसामुळे 44 घरांचे पूर्णत: तर 1 हजार 368 घरांचे अशंत: नुकसान झाले आहे. कोकण विभागात रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पूरस्थिती नाही. मुंबई- गोवा महामार्गावरील परशुराम घाट हा 3० जुलैपर्यंत सायंकाळी 7 ते सकाळी 6 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

तसेच राजापूर कोल्हापूरला जोडणारा अनुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात 2 एनडीआरएफ टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

विदर्भात पावसाने सध्या थोडा ब्रेक घेतला असला तरी यवतमाळ जिल्ह्यातील 19 आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 15 अशी 26 गाव पुराच्या विळख्यात आहेत. यवतमाळच्या वातुवचातील तीन गावांची स्थिती भीषण आहे, या भागात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी वर्धा येथून राज्य आपत्ती निवारण दलाचे पथक वणीकडे निघाले आहे. सोमवारी यवतमाळ जिल्ह्यातील
पाच तालुक्यात अतिवृष्टी झाली होती.

त्यातच बेंबळा प्रकल्पासह जिल्ह्यातील आठ प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग केल्याने बाभूळगाव, मारेगाव, राळेगाव, कळंब आणि वणी या पाच गावात पूरस्थिती निर्माण झाली. वैनगंगा नदीला पूर आल्याते चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, बल्लारपूर आणि पोंभुर्णा तालुक्यातील गावे बाधित झाली आहेत.

बुलडाणा, अकोल्यात पूरपरस्थिती कायम
जिल्ह्यातील सहा तालुक्‍यांमध्ये पावसाने मंगळवारी ब्रेक घेतला. तरीही पूर्णा नदीला आलेल्या पुरात नांदुरा-जळगाव जामोद येरळी पुलावर पाच ते सहा फूट पाणी मंगळवारीही वाहत होते. मलकापूर तालुक्‍यात विश्‍वगंगा नदीच्या पुरामुळे काळेगाव, वात नदीच्या पुरामुळे कोलद, वडगाव वान, दानापूर या गावांचा संपर्क आट्यापाशी तुटलेलाच आहे. पावसाने पिकांचे मोठे तुकसान झाले असून भरपार्ड देण्याची मागणी होत आहे. गांधीग्राम येथील पूर्णा नदीचा पूर कायम आहे. यामुळे अकोट-अकोला मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. देवरी अंदुरा व शेगाव रस्ता बंद असल्याने नागरिकांची गैरसोय झाली. तेल्हारा तालुक्‍यातील पूर्णा, गोंतमा, विदुपा नद्यांना पूर असल्याने नेर, पिवंदळ, सांगवी, उपरी या गावांचा संपर्क तुटला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *