महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० जुलै । वेस्ट इंडीजविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय आणि पाच सामन्यांची टी-20 मालिका (West Indies vs India) खेळण्यासाठी भारतीय संघ त्रिनिदाद येथे दाखल झालाय. नुकतंच भारतीय नियामक मंडळानं म्हणजेच बीसीसीआयनं (BCCI) भारतीय खेळाडूंचा त्रिनिदाद विमानतळावर (Trinidad Airport) पोहचल्याचा एक व्हिडिओ ट्विटवर शेअर केलाय. या व्हिडिओत शिखर धवन (Shikhar Dhawan), युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal), श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), आवेश खान (Avesh Khan), इशान किशन (Ishan Kishan) आणि मोहम्मद सिराजसह (Mohammed Siraj) अनेक खेळाडू विमानतळावर दिसत आहेत.
Trinidad – WE ARE HERE! 👋😃#TeamIndia | #WIvIND pic.twitter.com/f855iUr9Lq
— BCCI (@BCCI) July 20, 2022
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिकेला येत्या 22 जुलै 2022 पासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाईल.टी-20 मालिकेतील पहिला सामना 29 जुलैला होणार आहे. तर, पाचवा आणि अंतिम सामना 7 ऑगस्ट 2022 खेळण्यात येणार आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यापूर्वी बीसीसीआयनं वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केलीय. या दौऱ्यात विराट कोहली, जसप्रीत बुमराह यांसारख्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.
बीसीसीआयचं ट्वीट-
भारताचा एकदिवसीय संघ
शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकिपर), संजू सॅमसन (विकेटकिपर), शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान , प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.
वेस्ट इंडीजचा एकदिवसीय संघ
निकोलस पूरन (कर्णधार), साई होप (उपकर्णधार), शेमार ब्रुक, केसी कार्टी, जेसन होल्डर, अकिल होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, गुडाकेश मोटे, कीमो पॉल, रोव्हमन पॉवेल, जयडेन सील्स
राखीव:रोमेरो शेफर्ड आणि हेडन वॉल्श जूनियर
भारताचा टी-20 संघ
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रवींद्रचंद्र अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, अव्वल खान. हर्षल पटेल, अर्शदीप सिंग. (केएल राहुल आणि कुलदीप यादव यांची निवड त्यांच्या फिटनेसवर अवलंबून असेल.)