महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ जुलै । टी-20 (T20I) मध्ये अनेक गोलंदाजांनी हॅट्ट्रिक घेतली, पण मायकेल ब्रेसवेलच्या (Michael Bracewell) हॅट्ट्रिकची बाबच वेगळी आहे. ही सर्वात अनोखी हॅट्ट्रिक आहे. अशी हॅट्ट्रिक घेणारा ब्रेसवेल हा पहिलाच गोलंदाज आहे. यामुळे क्रीडाप्रेमी देखील ब्रेसवेलवर चांगलेच खुश झाले आहेत. अनेकांनी त्याचा व्हिडीओ देखील व्हायरल केलाय. पण, त्याआधी ब्रेसवेलची हॅट्ट्रिक कधी आणि कुठे झाली हे जाणून घ्यायला हवं. त्यानं हा पराक्रम आयर्लंडविरुद्ध (IRE vs NZ) खेळल्या गेलेल्या दुसऱ्या T20 सामन्यात केला आहे. आयर्लंडच्या डावातील 14व्या षटकात त्यानं तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर विकेट घेत आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली. या हॅट्ट्रिकसह आयर्लंडचा खेळ संपला आणि नवा इतिहास रचला गेला आहे. यानंतर ब्रेसवेलनेही न्यूझीलंडसाठी मालिकेवर शिक्कामोर्तब केला आहे.
Michael Bracewell can't Do anything Wrong
Hat-trick in his First Over of T20 Internationals is just amazing and Unbelievable 🥵pic.twitter.com/nIPmvgCmjM— ⚡ (@Visharad_KW22) July 20, 2022
मायकेल ब्रेसवेलने इतिहासात आपलं नाव नोंदवलं आहे. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. न्यूझीलंडचा ऑफस्पिनर ब्रेसवेलनं आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या T20 मध्ये ही कामगिरी केली. ब्रेसवेलनं कारकिर्दीतील दुसरा टी-20 खेळताना 5 चेंडूत 3 बळी घेत न्यूझीलंडला 88 धावांनी मोठा विजय मिळवून दिला. या सामन्यात प्रथम खेळताना न्यूझीलंडनं 4 गडी गमावत 179 धावा केल्या. प्रत्युत्तरात यजमान आयर्लंडचा संघ 13.5 षटकांत 91 धावांत गारद झाला. अशाप्रकारे किवी संघाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.