मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री दिल्लीत ; खातेवाटपाबाबत चर्चा सुरू ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ जुलै । राज्य मंत्रिमंडळाची विस्ताराला मुहूर्त लागला आहे. भाजपच्या केंद्रीय कार्यकररिणीसोबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाल्यानंतर उद्या एकाच टप्पात 30 जणांचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला 4 आमदारांमागे एक मंत्रिपद असे 13 मंत्रिपदे देण्यात येणार आहे. शिंदेंच्या गटात सामील झालेल्या 5 जणांकडे आधीच कॅबिनेट मंत्रिपद होते, तर अब्दुल सत्तार आणि शंभुराज देसाईंकडे राज्यमंत्री पदाची जबाबदारी होती. शिंदे गटाला मिळणाऱ्या 13 मंत्रिपदामध्ये कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद देखील आहेत. यात एकनाथ शिंदेंसह 5 जणांचा मंत्रिमंडळ विस्तारात नंबर लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांच्या सन्मानार्थ स्हेहभोजनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे उपस्थित राहणार आहे. मात्र हा कार्यक्रम संध्याकाळी असला तरी मुख्यमंत्री 4 वाजता दिल्लीत जाणार आहेत. यानंतर ते भाजप पक्षश्रेष्ठीसोबत चर्चा करणार आहेत. यानंतर उद्या मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता आहे.

भाजपचे जवळपास 22 आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये चंद्रकांत पाटील, सुध्रीर मुनगंटीवार, आशिष शेलार, गिरीश महाजन, यांच्यासह राम शिंदेंसह राधाकृष्ण विखे पाटील यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. तर शिंदे गटातील संदीपान भुमरे, उदय सामंत, दादा भूसे, शंभुराज देसाई, अब्दुल सत्तार यांचा समावेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आज 22 दिवसानंतरही मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने इच्छूकांमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे. सर्वाेच्च न्यायालयाचा निकालामुळे मंत्रिमंडळ विस्तार झाला नव्हता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *