‘गुगल मॅप’ने परत केला बदल : संभाजीनगरचे पुन्हा औरंगाबाद, धाराशिवचे केले अखेर उस्मानाबाद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ जुलै । काही दिवसांपूर्वी गुगल मॅपवर औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे इंग्रजीत दाखवण्यात येत होते. त्यानंतर गुगलने यु टर्न घेतला असून, पुन्हा संभाजीनगर काढून औरंगाबाद असे नाव कायम ठेवले आहे. तर धाराशिवचे उस्मानाबाद केले आहे. गुगलने काही दिवसांसाठी हे नाव का बदलले होते, आणि आता पुन्हा का बदल केला, अशा उलट-सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.

राज्यात संत्तातर झाल्यानंतर शिंदे सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नामांतर केले. त्यानूसार, औरंगाबादचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्यात आले, गुगलने देखील आपल्या मॅपवर या दोन्ही शहरांचे नावे बदलली होती, याला औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध दर्शवत गुगलकडून स्पष्टीकरण मागितले होते. त्यानंतर आज पुन्हा गुगलने आपल्या मॅपवर गुन्हा औरंगाबाद असे टाकले आहे. गुगलने हे पाऊल नेमके का उचले होते याबाबत अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

3 दिवसांपूर्वी केला बदल
गुगल मॅपने तीन दिवसांपूर्वी औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नाव बदलले होते. गुगलने मॅपमध्ये औरंगाबादचे नाव बदलून आता संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव असे केले होते. मॅपवर औरंगाबाद असे शोधल्यानंतर संभाजीनगर असे आपोआप रिझल्ट येत होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत त्यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय घेतला होता.

केंद्राची मंजुरी नाही
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी घेतलेला नामांतराचा निर्णय अयोग्य असल्याचे म्हणत शिंदे सरकारने पुन्हा आपल्या कॅबिनेटमध्ये शहराच्या नामांतराचा निर्णय घेतला. राज्य सरकारने या दोन शहरांचा नामांतराचा निर्णय घेतला असून, मात्र, उद्याप केंद्राने याला मंजुरी दिलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *