महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ जुलै । भारताचा वेस्ट इंडिज दौरा आजपासून सुरू होणार आहे. भारतीय संघ तीन वन डे आणि पाच टी२० सामने खेळणार आहे. दौऱ्याची सुरूवात वन-डे मालिकेने होणार आहे. मालिकेतील पहिला सामना पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल येथे आज होणार आहे. उर्वरित दोन वन डे (२४ आणि २७ जुलै) देखील याच मैदानावर होणार आहेत. या मालिकेसाठी रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह यासारख्या बड्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. पाहूया आजच्या सामन्यासाठी कशी असेल प्लेइंग-११…
टीम इंडियाची प्लेइंग-११ असं असू शकतं -शिखर धवन, इशान किशन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, अक्षर पटेल ,शार्दूल ठाकूर, आवेश खान, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल
भारत विंडीज वन-डे मालिका
२२ जुलै – पहिली वन डे – पोर्ट ऑफ स्पेन
२४ जुलै – दुसरी वन डे – पोर्ट ऑफ स्पेन
२७ जुलै – तिसरी वन डे – पोर्ट ऑफ स्पेन
(सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता)
वन डे मालिकेसाठी भारताचा एकूण संघ- शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, शुबमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग.