Edible Oil Import : खाद्यतेलाची आवक वाढली ; खाद्यतेलांच्या दरात घट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ जुलै । सरकारच्या बदलत्या धोरणाचा कायम परिणाम शेतीमालाच्या दरावर झालेला आहे. शेतीमाल किंवा खाद्यतेलाची आयात निर्यातीमध्ये होत असलेल्या बदलाचे परिणाम थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाणवत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पामतेलाच्या दरात घट होणार अशी चर्चा होती पण आता प्रत्यक्ष आयात वाढल्याने (Edible Oil) सोयाबीन आणि पामतेल हे स्वस्त झाले आहे. खाद्यतेलाची दोन देशातून आयात वाढल्याने तब्बल 50 रुपयांनी तेल स्वस्त होणार आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी ही दिलासा देणारी बाब असली तरी शेतकऱ्यांच्या आणि विशेषत: सोयाबीन उत्पादकांच्या चिंतेत मात्र भर पडणार आहे. कारण (Soybean Rate) सोयाबीनच्या दरात कमालीची घट होत आहे. यंदा तर विक्रमी क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाल्याने दराचे चित्र काय राहणार हा देखील मोठा प्रश्न आहे.

 

सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी खाद्य तेलाच्या आयातीवर भर दिला जात आहे. आयात वाढल्यास दर नियंत्रणात राहून सर्वासामन्यांमध्ये जो रोष आहे तो कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यानुसार इंडोनेशिया आणि मलेशियातून पामतेलाची आवक वाढली आहे. वाढत्या आयातीमुळे पामतेल आणि सोयाबीन तेलाच्या दरात 50 रुपयांची घट होणार आहे. या दोन तेलाचा सर्रास वापर वाढत आहे. त्यामुळे आयात वाढवून दरावर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय केंद्राने घेतलेला आहे.

सोयाबीनच्या दरात मात्र घट
एकीकडे खाद्यतेलाचे दर घटत असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळत असला तरी दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. कारण हंगामाच्या अंतिम टप्प्यात सोयाबीनला विक्रमी दर मिळे अशी अपेक्षा असताना सोयाबीन हे 6 हजार 100 रुपये क्विंटलवर येऊन ठेपले आहे. यंदाच्या हंगामात सोयाबीन हे 7 हजार 300 पर्यंत गेले होते. घटत्या उत्पादनामुळे हंगमाच्या अंतिम टप्प्यात दर वाढतील असा अंदाज होता पण आता सरकारच्या धोरणाचा परिणाम सोयाबीन दरावर झालेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *