महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी। आकाश शेळके – गरजूंची भूक भागवणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात हातांचे गरजूंन कडून मन: पूर्वक धन्यवाद. बीड शहरामध्ये एक आगळी वेगळी मोहीम राबवली जात आहे बीड शहरात अडकलेले प्रवासी व अन्य गोरगरीब गरजूंना शहराच्या जवळच्या २५ गावांमधून माय माऊल्या ५००० भाकरी दररोज करून पाठवतात. जिओ जिंदगी ग्रुपचे तरुण सदस्य या भाकरी गोळा करून गरजूंची भूक भागवण्यासाठी पोहोच करतात. रोज या भाकरींची संख्या वाढतच आहे.

हजारो भाकरींचा माणुसकीशी गाठ घालून देणारा हा प्रवास बीड जिल्ह्यातच होऊ शकतो! भाकरी पुरवणाऱ्या माय माऊल्यांना आणि ती भुकेलेल्या गरजूपर्यंत पोहचवणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात हातांचे गरजुंनी मनःपूर्वक धन्यवाद मानले .

#जिओ_जिंदगी #WarAgainstVirus #StayHomeStaySafe