महाराष्ट्र २४- ऑनलाईन । बीड । विशेष प्रतिनिधी । आकाश शेळके । कोरोनाचा धोक्यापासून नागरिकांना दूर ठेवण्यात जिल्हा प्रशासनाला आतापर्यंत यश आले आहे. यापुढेही सावधगिरी बाळगून जिल्ह्याला कोरोनापासून दूर ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील. राज्य सरकारने कापूस खरेदी करण्यासाठी परवानगी दिली आहे, त्यानुसार येत्या २३ तारखेपासून खरेदी केंद्रावर कापूस खरेदी सुरू करण्याचे आदेश दिलेत तसेच हरभरा खरेदी सुरू करण्यासाठी २ दिवसात ग्रेडर नेमण्याचे आदेशही संबंधितांना दिलेत. नागरिकांनी सोशल डिस्टन्सींगचे पालन करत व्यवहार करावे.
या संकट काळात धान्याचे नियतन नियमाप्रमाणे करा; कोणताही गैरव्यवहार खपवून घेणार नाही . पालकमंत्री धनजंय मुंडे यांचा सज्जड इशारा, आतापर्यंत जिल्ह्यातील १७ स्वस्त धान्य दुकानदारांचे परवाने निलंबित गेवराईच्या ‘त्या’ दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला बैठकीत ते असे ही म्हणाले.