महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ जुलै । दिल्ली विमानतळावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट झाली आहे. या भेटीत मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखेवर शिक्कामोर्तब करूनच शिंदे पहाटे 5 वाजता औरंगाबादेत परतले आहेत. दिल्लीविमानतळाच्या व्हीआयपी कक्षात या दोन्ही नेत्यांमध्ये 45 मिनिटे चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान एकनाथ शिंदेंनी कालही केलेल्या दिल्लीवारीत ते एकटेच गेले होते. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा भाजपचा एकही नेता दिल्लीदौऱ्याला सोबत नव्हता.फडणवीसांना टाळून शिंदे यांच्या फडणवीस यांच्यासोबत भेटी होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.