शिकार करणे पडले महागात ; सोशल मिडीया वर व्हाट्सअप ला स्टेटस ठेवलेले फोटो ; नांदेड वनविभागाची कारवाई

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – नांदेड – विशेष प्रतिनिधी – संजीवकुमार गायकवाड – आज दिनांक आज दिनांक 20 4 2019 रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी, नांदेड श्रीधर कवळे यांनामौजे मेंडका तालुका मुदखेड या गावातील काही तरुणांनी रानडुक्कर या वन्य प्राण्या ची शिकार केल्याचे सोशल मिडीया वर व्हाट्सअप ला स्टेटस ठेवलेले फोटो आढळून आले. सदरील व्हाट्सअप स्टेटस ला ठेवलेल्या फोटोवरून नांदेड वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री आशिष ठाकरे सहाय्यक वनसंरक्षक डी एस पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीधर कवळे, मुदखेड वनपाल श्री जोशी, फीरते पथक वनपाल श्री बंडगर, वनरक्षक केंद्रे श्याम घोडके,मारुती कवळे , शेख ह्यांनी कारवाई केली .

यांनी फोटोतील आरोपींची ओळख पटवून खालील चार आरोपीवर वन्यजीवसंरक्षण अधिनियम 1972 च्या कलम 09,39 व 51 नुसार वनगुन्हा क्र 1/2020 नुसार वनगुन्हा दाखल केले आहेत . आरोपींची नावे खालील प्रमाणे संतोष संभाजी कोरेबोईनवाड वय 23 वर्ष, माणिक पतना जंगीलवाढ , वय 26 वर्षे , लक्ष्मण साहेबराव जंगीलवाड 22 वर्ष , व्यंकट बालाजीमुक्केवाड ,वय 23 वर्ष सर्व आरोपी राहणार मेंडका तालुका मुदखेड वरील आरोपींना अटक करूनप्रथमवर्ग न्यायाधीश भोकर यांच्याकडे हजर करण्यात आले असून चार ही आरोपीना 1.दिवसाची वन कोठडी दिली असुन पुढील तपास चालू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *