महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३ ऑगस्ट । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी काल गणपती मंडळांसोबत बैठक घेतली. यावेळी गणपती मंडळांसदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला. यावर्षी गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे. गणेशोत्सवातील शेवेटचे पाच दिवस रात्री १२ वाजेपर्यंत स्पीकरला परवानी देण्यात आली आहे. पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ही घोषणा केली.
ऐतिहासिक वारसा गणपती मंडळ पुण्याला आहे. पुण्याला अनेकजण गणेशोत्सव पाहायला येत असतात. काही मागण्या होत्या, त्या मंडळासोबत बैठक पार पडली. कोविडमुळे सण उत्सव साजरा करता आला नव्हता, पण आता सगळे नियम पाळून उत्सव साजरा करायचे आहेत, असंही मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) म्हणाले. (Eknath Shinde Latest News)
मंडप शुल्क माफ करण्यात आला आहे. परवानगीसाठी चकरा माराव्या लागणार नाहीत. गणपती उत्सव मंडळांना अडचण येणार नाही जिल्हाधिकारी सगळे पाहणार आहेत. मिरवणूका नियम पाळून करू. कुठलीही अडचण येणार नाही हे पाहूया. कोर्टाचे नियम पाळून सण साजरे करुया. शेवटचे पाच दिवस १२ पर्यंत परवानगी आहे, अशी घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली.