महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी -सलमान मुल्ला । दि. ३ ऑगस्ट। कळंब । सध्या अमेरिकेतील फ्लोरिडा ॲग्रीकल्चर रिसर्च सेंटर येथे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ व संचालक यापदावर कार्यरत असलेले येरमाळा गावचे भूमीपूत्र डाॅ.बालाजी आंबादास आगलावे यांना दिल्ली येथे ‘भारतीय किसान संघ’आयोजित “आंतरराष्ट्रीय कृषी परिषद” यासाठी भारताचे केंद्रीय कृषी मंत्री मा.नरेंद्रसिंग तोमर यांनी प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केले होते यानंतर ते आपल्या मूळगावी स्वगृही आल्यावर त्यांनी जि.प.प्रा.शाळा,देवधानोरा येथे भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत हितगुज केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व भारत देशाचे भविष्य म्हणजेच हे विद्यार्थी असून त्यांनी जिद्दीने व प्रामाणिक प्रयत्न केले तर त्याची स्वप्ने निश्चित पूर्ण होतील असे सांगितले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांना स्वयंस्फूर्तीने प्रश्न विचारले त्या विचारलेल्या प्रश्नास डॉ.बालाजी यांनी उत्तरे दिली.
शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी श्री सूर्यकांत बेद्रे , श्री राहुल बेद्रे ,मु.अ.श्री.बाळकृष्ण कुंभार,श्री.निकम सर,श्री.आगलावे सर,श्री.सुरवसे सर,श्री.पाळवदे सर,श्री.कांबळे सर व श्रीम.तांबे मॅडम उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.नवनाथ तुंदारे यांनी केले.