Vande Bharat Express : ‘या’ ट्रेनमध्ये प्रवाशांना नॉनव्हेज खाण्यास बंदी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ ऑगस्ट । वंदे भारतमध्ये ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ट्रेनमधील जेवणाबाबत रेल्वेने मोठी घोषणा केली आहे. आता दिल्ली-कटरा वंदे भारत ट्रेनमध्ये नॉनव्हेज खाण्यास आणि नेण्यास मनाई करण्यात आली आहे. वंदे भारत ट्रेन ही देशातील अशी पहिली ट्रेन आहे, जिला सात्विक प्रमाणपत्र देण्यात आले आहे. म्हणजेच आता ही ट्रेन पूर्णपणे हायजिनिक आणि शाकाहारी आहे.

ट्रेनमध्ये खानपान सुविधा पुरवणाऱ्या इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन आणि सात्विक कौन्सिल ऑफ इंडिया यांच्यात यापूर्वीच एक करार करण्यात आला आहे.

IRCTC ने वंदे भारत ही सात्विक ट्रेन बनवण्यास सुरुवात केली आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, हळूहळू धार्मिक स्थळी जाणाऱ्या इतर गाड्याही सात्विक केल्या जातील. प्रवासादरम्यान, अनेक प्रवाशांना ट्रेनमध्ये दिले जाणारे जेवण आवडत नाही, कारण त्यांना खात्री नसते की ट्रेनमध्ये मिळणारे अन्न पूर्णपणे शाकाहारी आणि आरोग्यदायी आहे.

ट्रेनमधील जेवणाबाबत प्रवाशांमध्ये शंका असतात. ट्रेनमध्ये जेवण बनवताना स्वच्छतेची किती काळजी घेतली गेली? व्हेज आणि नॉनव्हेज वेगवेगळे शिजवले जाते का? जेवण बनवण्यापासून ते सर्व्ह करण्यापर्यंतची प्रक्रिया काय असते? असे अनेक प्रश्न प्रवाशांच्या मनात असतात. अशा प्रवाशांच्या अडचणी दूर करण्यासाठी आता भारतीय रेल्वेने सात्विक ट्रेन सुरू केली आहे.

भारतीय सात्विक परिषदेचे संस्थापक अभिषेक बिस्वास यांनी सांगितले की, वंदे भारत ट्रेनला सात्विक प्रमाणपत्र देण्यापूर्वी अनेक प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. त्याअंतर्गत स्वयंपाक करण्याची पद्धत, स्वयंपाकघर, सर्व्हिंग आणि सर्व्हिंग भांड्यांची देखभाल तपासण्यात आली. सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतरच प्रमाणपत्र देण्यात आले. म्हणजेच रेल्वेने पूर्ण तयारी केल्यानंतर प्रमाणपत्र दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *