उद्या मंत्रिमंडळ विस्तार : शिंदे गट, भाजपकडून ही नाव आघाडीवर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ ऑगस्ट । सत्तासंघर्षात अडकलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त सापडला. उद्या सकाळी 11 वाजता मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यात एकनाथ शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, उदय सामंत, संजय शिरसाट, दादा भुसे, संदीपान भुमरे यांच्या नावाची चर्चा आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात बैठक झाली. त्यात 15-35 च्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाल्याचेही सूत्रांनी सांगितले. याचबरोबरच 10 ऑगस्टपासून विधीमंडळाचे अधिवेशन असल्याने सचिवालयातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची उद्याची मोहर्रमची सुटी रद्द करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे गट

1) गुलाबराव पाटील 2) उदय सामंत 3) संजय शिरसाट 4) दादा भुसे 5) संदीपान भुमरे

भाजपचे संभाव्य मंत्री

1) चंद्रकांत पाटील 2) सुधीर मुनगंटीवार 3) राधाकृष्ण विखे – पाटील 4) गिरीश महाजन

उद्या चित्र स्पष्ट होईल – मुख्यमंत्री

मंत्रिमंडळ विस्ताराचे चित्र उद्या स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते नांदेडमध्ये आले असता बोलत होते. शिंदे हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शिंदे यांचे आज नांदेड येथील श्री गुरू गोविंदसिंहजी विमानतळावर आगमन झाले. विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर काहीही ठोस उत्तर दिले नाही. मात्र, मंत्रिमंडळात नक्की कोणती नावे असतील..? कुणाला संधी मिळेल..? याबाबत या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला उद्या मिळतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

कार्यालयीन आदेश जारी

विधीमंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची चालु आणि नियोजीत रजाही नऊ ते अठरा ऑगस्ट या कालावधीसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात कार्यालयीन आदेशच काढण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *